मुदखेड येथे भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन.

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनिधी 

मुदखेड शहरातील भगवान बिरसा मुंडा चौक येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन मुदखेड नगर पालिकेचे माजी उपनगरध्यक्ष तथा सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण देवदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक खंडेराव वडे सर, युवक काँग्रेसचे ऋषी पारवेकर, रामजी धडे, प्रल्हाद लोकरे पाटील, अशोक रेडेवार, ऋषी बेंबरे, देविदास बोंडले, कोलगाने,मोडवान अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थीत होते. 

या प्रसंगी उपस्थित मान्यवर मंडळींना उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे, खंडेराव वडे सर यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या