स्वातंत्र्यदिनानिमित्त बारड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेकडून कोरोना योद्धाचा गौरव

संपादक आशिष मुगटकर

गौरव :- मुदखेड तालुक्यातील बारड येथील जिल्हा परिषद केंद्रीय  प्राथमिक कन्या शाळेकडून कोरोना योद्धा आशा वर्कर ताई यांचा गौरव  करताना उपस्थित मान्यवर


बारड / प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील बारड येथील  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेच्या वतीने स्वातंत्र्य दिना निमित्ताने कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा नकरता कार्य केलेल्या  ग्रामीण रुग्णालय बारड अंतर्गत कार्यरत असलेल्या आशा वर्कर ताईं यांचा कोरोना योद्धा म्हणून गावात उत्कृष्ट कार्य केले असून यावेळी त्यांच्या कार्याचा गौरव  केंद्रीय प्राथमिक कन्या शाळे कडून सत्कार स्मृती चिन्ह साडीचोळी देऊन गौरविण्यात आले आहे. प्रथम पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्य केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा मुख्याध्यापक संजय माहूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दीनानिमित्य शुभेच्छा दिल्या . यावेळी कार्यक्रमास जि.प.हायस्कूल शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलासराव देशमुख,कन्या शाळा शा.व्य.समिती अध्यक्ष  नरसिंगराव आठवले, उपाध्यक्ष  सोनालीताई देशमुख,समाजसेवक रामेश्वर अण्णा गोडसे,बळीराम लोणवडे, सौ. बलदवाताई,  जि.प.हास्कूल मुख्यध्यापक बालाजी बोन्लावार, कन्या शाळा मुख्याध्यापक संजय माहूरकर, शिक्षक दिगंबरराव कदम,आशोक निलगार आदी प्रमुख उपस्थितीत होते.

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरसिंग आठवले यांच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्याना त्यांच्या केलेल्या कार्याची दखल घेत हा उपक्रम राबविला आहे.यावेळी आशा वर्कर ताई यांनी केंद्रीय कन्या शाळेच्या उपक्रमाचे स्वागत केले असून याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी,ग्रामपंचायत सदस्य,दोन्ही शाळेतील सर्व शिक्षक वृंद, अंगणवाडी ताई, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाळे मॅडम यांनी केले.तर आभार मु.अ.संजय माहूरकर यांनी मानले,कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपक्रमशील शिक्षक  दिगंबरराव कदम, अशोक निलगार आदीसह शाळेच्या सर्व शिक्षक बंधु-भगिनींनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या