शेतकऱ्यांनचे कामधेनू असलेल्या ईसापुर जलशयाचा पाणीसाठा झाला ८० टक्के

 शेतकऱ्यांना बागायतीसाठी पाणी पाळ्या मिळणार  उपविभागीय अधिकारी यांची माहिती

संपादक आशिष मुगटकर


बारड / प्रतिनिधी

पावसाळा सुरू होवून दोन महीने झाले परंतु  आठवड्यात पडणाऱ्या पावसाने ईसापुर जलाशयाच्या पाणी साठ्यात मुबलक वाढ झाली असुन धरणात जिवंत पाणी साठा ८० टक्के झाला असून धरणाच्या सौर्स वाँटर फोल्लो द्वारे पाणी थोड्या प्रमाणात चालू असून धरणाचा पाणी साठा वाढणारच शेतकऱ्यांना बागायती साठी पाणी पाळ्या उपलब्ध होणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीयअधिकारी रमेशराव देशमुख यांनी यावेळी दीलीआहे. शंभर टक्के पाणीसाठा कधी होतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून धरण पुर्णपणे भराण्याची अपेक्षा शेतकऱ्यांन कडून व्यक्त केली जात आहे.

हरितक्रांती चे जनक डॉ शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टी धोरणाने या भागाचा कायापालट झाला असून हरित क्रांती घडली आहे या परिसरातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी तसेच हा परिसर बागायती होण्यासाठी डॉ शंकरराव चव्हाण यांनी  इसापूर धरणाच्या माध्यमातून या भागात जलक्रांती घडवून आणली आहे.त्यांच्या या दूरदृष्टी धोरणाने या परिसरातील शेतकरी केळी, ऊस, हाळद, फळबागा,खरबूज, टरबुज, अशी बागायती पिके भर उन्हाळ्यात धरणाच्या पाण्याच्या माध्यमातून घेत असून लाखोचे उत्पादन काढतआहे.धरणाच्या माध्यमातून परिसराचा कायापालट झाला असून सुजलाम सुफलाम बनला असून सर्वत्र हरितक्रांती घडली आहे

धरण शंभर टक्के झाले म्हणजे पुढील एक वर्षे बागायती पिके शेतकऱ्यांना काढता येतात. धरणात मोठा पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना बागायती पिके घेण्यासाठी मुबा मिळतो तर त्या दुष्टीने शेतकरी पुढील पिकाच्या नियोजनाची वाटचाल करीत असतो

गेल्या वर्षी धरणात पाणी साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होता त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासली नाही तर धरणाच्या माध्यमातून बागायती पिके घेण्या साठी वाव मिळाला होता नदी नाल्याना  पाणी सुटल्याने पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला होता.त्यामुळे यापरिसरातील शेतकऱ्यांसाठी बागायती ला आधार देणारे ईसापुर धरण हे कामधेनू बनले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या